उद्या हेरिटेज वॉक मध्ये कर्णपुरा ऐतिहासिक वारसाची सफर घडविणारं...
कर्णपुरा ऐतिहासिक वारशाची सफर घडविणार
‘कर्णपुरा हेरिटेज वॉक’ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- शहराच्या समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच शहराच्या प्राचीन वैभवाचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने शनिवार, दि.31 ऑक्टोबर 2026 रोजी ‘कर्णपुरा हेरिटेज वॉक’* चे आयोजन करण्यात आले आहे.
कर्णपुरा आणि नवरात्रोत्सव यांचे समीकरण सर्वश्रुत असून, या परिसराला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र, या परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मूर्ती आणि धार्मिक स्थळांची माहिती अनेकांना अद्याप नाही. हीच ऐतिहासिक ओळख सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून कर्णपुरा परिसरातील देवीची प्राचीन मूर्ती, सुंदर बारव, बालाजी मंदिर, जैन मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर यांसह अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. या ठिकाणांचा इतिहास, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची संधी सहभागी नागरिकांना मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि INTACH छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि शहरातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शहराचा समृद्ध वारसा जाणून घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : शनिवार, 31 ऑक्टोबर 2026
वेळ : सकाळी 7 ते 9
जमण्याचे ठिकाण : पंचमुखी हनुमान मंदिर, कर्णपुरा.
आपल्या शहराचा इतिहास जाणून घेणे, ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व समजून घेणे आणि हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी या ऐतिहासिक सफरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?