एडसग्रस्त मुला मुलीसोबत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी साजरी केली होळी...!
 
                                एड्स ग्रस्त मुलां - मुलींसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा होळी सण साजरा...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज): शहरातील बाबासाई एड्स ग्रस्त मुला - मुलींच्या बालगृहात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख नंदू लबडे यांच्या वतीने आयोजित होळीच्या सणात सहभागी होऊन राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथील मुलांसोबत होळीचा सण साजरा केला. मागील 12 वर्षांपासून या मुलामुलींसोबत सातत्याने होळीचा सण साजरा करत आलो आहे. दरवर्षी या मुला मुलींच्या आनंदात रंग उत्सवाच्या सणात सहभागी होऊन नेहमीच ऊर्जा मिळत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली..
समाजातला भ्रष्टाचार, जातीयता, बालविवाह अशा दुर्गुणांचे दहन होऊ दे, तसेच राज्यात प्रसन्नतेचे, आनंदाचे आणि भरभराटीचे विविध रंग भरू दे अशी प्रार्थना करत दानवे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या..
शेतकरी कर्जमाफी वरून शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहीण योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढविणाऱ्या घोषणेवरून फसवणाऱ्या राज्य सरकारच्या होळीचे अंबादास दानवे यांनी दहन केले. निवडणूक सरली.. कर्जमाफी विसरली.. लाडक्या बहिणीचे 2100 रुपये न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांच्या पाट्या लावलेल्या होळीचे दानवेनी दहन केले..
बाबासाई बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बालगृहात असलेल्या मुला - मुलींचा यावेळी एक आनंदमय खेळ घेण्यात आला. खेळात सहभागी झालेल्या सर्व मुला मुलींना एकत्रित कॅरम, बॅडमिंटन आणि चेसचे बक्षीस स्वरूपात भेट दिली.
याप्रसंगी उपशहरप्रमुख बापू पवार, विनिश शामकुवर, हेमंत केवट, विशाल राऊत, प्रेम पेंढारकर, सुदर्शन मनपुरे, नागेश शिंदे, मनीष मगरे, गोरख सोनवणे, अनिल थोटे, मराठी अभिनेत्री उल्का कुलकर्णी, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, संध्या कोल्हे, मंगल साळवी, कोमल पांढरे, मंगल हिवराळे, रुपाली लबडे, मंगल डोंगरे, रोहित इनकर, सचिन जाधव, माणिक जोरले, जगन्नाथ कोऱ्हाळे व बाळासाहेब दानवे उपस्थि
 
 
त होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            