एड जुबैर मोतीवाला सक्रीय, घेतली आमदार रोहित पवारांची भेट...

 0
एड जुबैर मोतीवाला सक्रीय, घेतली आमदार रोहित पवारांची भेट...

एड जुबैर मोतीवाला सक्रीय, घेतली आमदार रोहित पवारांची भेट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) -

आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार तथा प्रदेश महासचिव रोहित पवार हे शहराच्या दौ-यावर आले होते. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी पक्ष संघटना बांधणीसाठी मजबुत करण्यासाठी भेटीगाठी घेतल्या. शहरातील प्रतिष्ठित वकील तथा दिवंगत आमदार अमानुल्लाह मोतीवाला यांचे चिरंजिव एड जुबेर मोतीवाला यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. आगामी महापालिका निवडणुकीत ते पक्षात मोठी जवाबदारी स्विकारुन सक्रीय होणार अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे. पक्षाच्या प्रदेश सचिव पदावर त्यांनी काम केले. कायद्याचे जाणकार आहे‌. एकदा राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा निवडणुक लढली. आगामी काळात त्यांचा अनुभव व अल्पसंख्यांक चेहरा पक्षात सक्रीय झाले तर पक्षासाठी फायद्याचे ठरेल अशी चर्चा पक्षांतर्गत सुरु आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow