एमआयएमने जाळला पाकीस्तानाचा झेंडा, दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा...!
 
                                एमआयएमने जाळला पाकीस्तानाचा झेंडा, पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांतीचौकात एमआयएमच्या अक्रामक आंदोलन इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकीस्तानचा झेंडा जाळला. कश्मीर से आवाज आयी हिंदू-मुस्लिम भाई भाई अशा घोषणा दिल्या. मेणबत्त्या पेटवून देशातील 28 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑल पार्टी मिटींग बोलावली होती. उरी आणि पुलवामा येथे झालेल्या आतंकी घटनेच्या वेळी सुध्दा अशीच मिटींग बोलावली होती. त्यावेळीच पाकीस्तानवर कडक कारवाई केली असती तर हि जम्मू काश्मीरची घटना घडली नसती. शेजारी देश पाकीस्तानने येथे हिंदू -मुस्लिम मध्ये कितीही तेढ निर्माण करुन देश कमजोर करण्याचा प्रयत्न केला तरीही यश मिळणार नाही. आम्ही भारत देशातील नागरिक एक आहेत एक राहणार. या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करावी आम्ही सरकारसोबत आहोत. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर सरकारने हा दावा केला होता आता येथे शांती बहाल झाली आहे. सरकार आपली पाठ थोपटून घेत होती. म्हणत होते येथे आतंकवादी कारवाया बंद झाले आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू कश्मीरला स्वर्ग म्हणायचे, पर्यटक येथील स्वर्ग बघण्यासाठी देश विदेशातून येत होते. पर्यटकांनी संख्या वाढत असताना येथे रक्ताचे पाट देशाने बघितले याला जबाबदार कोण आहे. गुप्तचर यंत्रणा काय करत आहे. या निर्दोष पर्यटकांचा काय दोष होता. तेथे चप्प्या चप्प्यावर मिलिटरीचे जवान आहेत. आपल्याकडे जागोजागी टैन्क आहे मग शेजारी देशाची हिम्मत कशी होते आपल्या देशात येऊन अशी घटना घडवायची. या क्रुर आतंकवाद्यांवर कठोर कारवाई सरकारने करावी अशी आमची मागणी आहे.
यावेळी प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर, माजी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार, कुणाल खरात, विकास एडके, रफीक शेख, हाजी इसाक पटेल, एड खिजर पटेल, शेख शोएब, भाई इम्तियाज व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            