एमआयएमने माजी नगरसेवकाला उमेदवारी द्यावी, जहागिरदार यांनी शक्तीप्रदर्शन करुन दाखल केली इच्छुक उमेदवारी
एमआयएमने माजी नगरसेवकाला उमेदवारी द्यावी, जहागिरदार यांनी शक्तीप्रदर्शन करुन दाखल केली इच्छुक उमेदवारी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे गेल्या निवडणुकीत 11 नगरसेवक निवडून आले होते. या मतदारसंघात अनेक विकासकामे या नगरसेवकांनी पक्षाचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्याने लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना भरभरून मतदान झाले. पक्षाने उमेदवारी द्यावी या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकू. मागिल 36 वर्षांपासून मी राजकारणात आहे. पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशी येथील जनता, कार्यकर्ते यांची इच्छा आहे. पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तर या 11 नगरसेवकांमधून उमेदवारी दिली तरी मी पक्षाचा प्रचार करणार. अशी माहिती औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक अयूब जागिरदार यांनी माध्यमांना दिली आहे.
आज दुपारी आझाद चौक येथून इच्छुक उमेदवार अयूब जागिरदार यांच्या स्मरणार्थ चंपाचौक पर्यंत शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली काढण्यात आली. डोक्याला हिरवे फेटे, हातात एमआयएमचा झेंडा, तिरंगा झेंडा, ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत खुल्या जीपमध्ये बसून हि मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रमुख आकर्षण सोशल मिडिया इन्फ्लून्सर हाजी मोहम्मद कैफ यांची उपस्थिती होती. रस्त्यावर हार घालून लोकांनी जहागिरदार यांचा सत्कार केला. या रैलीत शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, प्रवक्ते आरेफ हुसेनी, डॉ.अफजल खान, हाजी कलिम आदी उपस्थित होते.
मोहंमद अयूब गुलाम जिलानी जागिरदार यांचा परिचय....
सन 1988 पासून ते सक्रिय राजकारणात आहे. त्यानंतर मुस्लिम लीग पक्षांकडून पहिल्यांदा नगरसेवक बनले. सन 2010 मध्ये समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बनले. एकदा लोकसभा निवडणुकीत भाग्य आजमावले. राजकारणाचा तगडा अनुभव व सोबत जनाधार असल्याने सन 2015 महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक एमआयएमने उमेदवारी दिली. मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. पक्षाने विरोधीपक्षनेते म्हणून काम करण्याची संधी दिली. औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. आता विधानसभा निवडणुकीत संधी द्यावी यासाठी आज त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
What's Your Reaction?