एसडिपिआईच्या पैठण तालूक्याची कार्यकारीणी घोषित...

एसडिपिआईच्या पैठण तालूक्याची कार्यकारीणी घोषित...
पैठण, दि.16 (डि-24 न्यूज) एसडिपिआई स्थानिक स्वराज्य निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तालूक्यात पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी कार्यकारीणी एसडिपिआईचे नेते डाॅ.हाफिज इम्रान यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आली आहे. तालूक्यातील जनसामान्यांचे प्रश्नांवर पक्षाच्या वतीने सरकारच्या दरबारी प्रश्न उपस्थित करणार असल्याचे डाॅ.हाफिज इम्रान यांनी यावेळी नियुक्ती देताना सांगितले.
नदीम शहा यांना पैठण तालूका अध्यक्षपदा निवड करण्यात आली आहे. सचिवपदी मुजंमील टेकडी, सह सचिव शेख अकील, सह सचिव हाशम अतार, कोषाध्यक्ष शेख जुनेद, सदस्यपदी शेख अलीम, मुआज खतीब, शेख तौफीक, शेख आसिफ, शेख अयूब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकारीणीचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






