औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांना उमेदवारी...!
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांना उमेदवारी
अकोला,दि.2(डि-24 न्यूज) पाच वेळेस औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले नेते अफसर खान यांना आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. अगोदर ते काँग्रेसमध्ये होते. आज त्यांनी वंचित मध्ये जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, योगेश बन, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरैशी, औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष मतीन पटेल यांच्या उपस्थितीत औरंगाबाद शहरात प्रवेश केला. मागिल एक वर्षापासून ते लोकसभा निवडणुकीची तयारीला लागले होते. आज अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांची उमेदवारी घोषित केले. औरंगाबाद शहरात त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
यासोबतच वंचितने तिस-या यादीत पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
यामध्ये नांदेड अविनाश भोसीकर, परभणी बाबासाहेब उगले, औरंगाबाद अफसरखान, पुणे वसंत मोरे, शिरुर मधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?