कटकट गेटमध्ये एटीएमला आग लागल्याने खळबळ, स्थानिक नागरिकांनी विझवली आग
 
                                कटकट गेटमध्ये एटीएमला आग लागल्याने खळबळ, स्थानिक नागरिकांनी विझवली आग
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) आज दुपारी तीन वाजेदरम्यान कटकट गेट, नेहरुनगर वार्डातील एका एटीएमला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आग लागल्याने स्थानिक नागरिकांनी बकेटांना पाणी टाकून आग विझवून आटोक्यात आणली तोपर्यंत एटीएम मशीन जळून खाक झाली होती. सतर्क राहुन स्थानिक नागरिकांनी आग विझवली नसती तर बाजूचे दोन दुकाने व घरांना हानी होण्याची भीती होती. आगीचे लोन व धूर दुरपर्यंत दिसत होता. एकीकडे सकाळपासून पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे एटीएमला आग लागली. आग कशामुळे लागली हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. जीन्सी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत पंचनामा सुरू आहे. किती नुकसान झाले मशिनमधील रोकड कीती जळाली हे तपासानंतर समोर येईल. स्थानिक नागरिकांनी पोलिस व अग्णिशमन दलाला याची कल्पना दिली होती. अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तोपर्यंत एटीएम मशीन जळून खाक झाली होती. बाबर काॅलनी येथे हा एटीएम आहे
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            