कल्याणकारी मंडळ, उद्यापासून रिक्षाचालक, टॅक्सीचालकांचे अर्ज भरून घेतले जातील, कोणतेही शुल्क नाही

कल्याणकारी मंडळ, उद्यापासून रिक्षाचालक व टॅक्सिचालकांचे अर्ज भरून घेतले जातील
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.18(डि-24 न्यूज), राज्य शासनाने ऑटोरिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सिचालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक मंडळाची स्थापना केली आहे. 19 सप्टेंबर 2024 उद्यापासून आरटिओ कार्यालयात अर्ज भरून घेतले जातील. जास्तीत जास्त रिक्षाचालक व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज भरून द्यावे असे आवाहन रिक्षाचालक मालक कृती समितीचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी केले आहे.
अर्जदाराचे नाव, आई वडिलांचे नाव, परवाना क्रमांक, वार्षिक उत्पन्न, लायसन्स क्रमांक, निवासी पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड असल्यास त्याचा क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, सदस्य संख्या, कुटुंबातील सदस्यांचे नाव अर्जात उल्लेख करायचा आहे. अर्ज भरताना पैसे देण्याची गरज नाही अशी माहिती निसार अहमद खान यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






