कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा, पाच पिडीत महीलांची सुटका...

निसर्ग हॉटेलच्या मागील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; पाच पीडित महिलांची सुटका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)–
शहरातील करोडी परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत 1 लाख 59 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री. ऋषिकेश सिंगारेड्डी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे निसर्ग हॉटेलच्या पाठीमागील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
या घटनेतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा प्रकाश चव्हाण (वय 24, रा. तिसगाव),
रवि काशिनाथ पौळ (34, रा. पौळ रांजणगाव),
किशोर सुखलाले गणराज (30, रा. वाळूज), कमलेश एकनाथ भालेराव (23, रा. तिसगाव),
संजय मानसिंग जाधव (41, रा. हिरापुरी, जि. बीड).
सदर ठिकाणी पाच पीडित महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत एकूण 1 लाख 59 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरील कार्यवाही पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त श्री. ऋषिकेश सिंगारेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, पोउपनि वैभव मोरे, शशिकांत सोनवणे, भास्कर गायकवाड, देविदास गडवे, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, जयदिप आढे, शिवाजी होडशिळ, वर्षा मुढे, मनिषा दाभाडे आणि सोनाली म्हस्के यांनी सहभाग घेतला.
पोलीस स्टेशन दौलताबाद येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरोधात पुढील कारवाई सुरू आहे.
What's Your Reaction?






