क्रांतीचौकात भाजपा महाविकास आघाडीत राडा, कंत्राटी भरती जी.आर.रद्द प्रकरण
 
                                क्रांतीचौकात भाजपा महाविकास आघाडीत राडा, कंत्राटी भरती जी.आर.रद्द प्रकरण
क्रांतीचौकात घोषणायुध्द तर पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला, महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून जल्लोष...
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) भाजपा शिंदे सरकारने कंत्राटी भरतीचा जी.आर.रद्द केल्याचा जल्लोष करण्यासाठी काँग्रेस, एन एस यु आय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक येथे एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू केला तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी येताच घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर भिडले. उध्दव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने घोषणाबाजी केली. कंत्राटी भरतीचा जी.आर. त्यांच्या काळातील पाप असल्याचे म्हणत प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र करण्यात आले. यावेळी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना माहिती मिळताच ते आंदोलन स्थळी आले व काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोश आला व वाद निवळला. त्यांनी मोर्चा सांभाळून जल्लोष पुन्हा सुरू झाला.
कंत्राटी भरतीचा जी.आर हा काँग्रेस सरकारच्या काळाताल असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच भाजपाचे कार्यकर्ते अक्रामक झाले व महाविकास आघाडी नाक घासा आंदोलन राज्यात सुरु झाले.
भाजपाच्या आंदोलनात समीर राजूरकर, शालिनी बुंदे, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, मीना मिसाळ, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, अमृता पालोदकर, मनिषा मुंडे आदी उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या मागणीला यश आले म्हणून कंत्राटी भरतीचा जी.आर सरकारला मागे घ्यावा लागला हा लोकशाहीचा व सर्वांचे यशाचा विजय म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, डॉ .पवन डोंगरे , एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, दिक्षा पवार, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे, काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, शिलाताई मगरे, रुबीना सय्यद, नगमा सिद्दीकी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            