खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस मुदतवाढ...

 0
खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस मुदतवाढ...

खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस मुदतवाढ...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - खरीप हंगाम 2025 करिता मोबाईल अँप द्वारे शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाही. याकारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये म्हणून शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 04 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहायक स्तरावरून पूर्ण करता येईल, असे जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दिनांक 13 सप्टेंबर 2025 ते आजपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने शेतात जाता येत नाही, तसेच बऱ्याच ठिकाणी ई-पीक पाहणी सर्वर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन बरोबर दाखवत नसणे, शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळत नसणे ई. अडचणीमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करु शकले नाहीत. या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख पुणे यांचे दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रानुसार शेतकरी स्तरावरून करावयाच्या ई पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

30 सप्टेंबर 2025 पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ई-पीक पाहणी करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow