शहरात होणार फुले -शाहु - आंबेडकर जलसाचे आयोजन...

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजन
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजन..
- दिनांक 19 व 20 सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(औरंगाबाद) - सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व भक्ती परपंराचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला सामाजिक उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजसुधारणा कार्याची महती, त्यांचा विचारांचा प्रसार करणाऱ्या शाहिरी, कवना, सत्यशोधकी जलशांची परंपरा जपणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तसेच समाज प्रबोधनात्मक गीतांचा समावेश असणारा फुले शाहू आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 19 व 20 सप्टेंबर 2025 या कालावधीत तापडिया नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर देवानंद माळी, शाहीर राजा कांबळे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, विजय सरतापे, ख्यातनाम गायिका रागिणी बोदडे, सरला वानखेडे, सपना खरात, चेतन कुमार चोपडे, रामलिंग जाधव यांच्या सुमधुर गितांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजनगर येथे होऊ घातलेल्या या फुले-शाहू-आंबेडकरी कार्यक्रमात सहभागी कलाकाराचा जागर करणाऱ्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
What's Your Reaction?






