उद्यापासून हम होंगे कामयाब छोटे उस्ताद राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होणार...

 0
उद्यापासून हम होंगे कामयाब छोटे उस्ताद राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होणार...

उद्या पासून"हम होंगें कामयाब" छोटे उस्ताद बाल कलावंतांकरिता राज्यस्तरीय प्रहसन (स्कीट) स्पर्धा-2025 चे बिगुल वाजणार

19 ते 20 सप्टेंबर पर्यंत विविध विषयांवरील प्रहसनाचे सादरीकरण

महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनेनुसार व उप आयुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांच्या अधिपत्याखाली 

टप्पा क्रमांक-3 टाउन हॉल कलादालन महानगरपालिका येथे दिनांक 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत हम होंगें कामयाब" छोटे उस्ताद बाल कलावंतांकरिता राज्यस्तरीय प्रहसन (स्कीट) स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता या राज्यस्तरीय प्रहसन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त तथा विभाग प्रमुख लाखिचंद चव्हाण, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण मंडळ तसेच इतर संस्था मुलांसाठी बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करतात.

मधल्या काळात महानगरपालिकेमार्फत ही अशा विविध बालनाट्य स्पर्धांचे आयोजन केले जात होते. या मातीत कलावंत निर्माण होण्याची ताकत असल्याने येथून मोठ-मोठे कलावंत, दिग्दर्शक, लेखक, निर्माते निर्माण झाले आहेत. दिनांक 19 सप्टेंबर 2025 पासून ते 20 सप्टेंबर 2025 पर्यंत टाऊन हॉल कलादालन महानगरपालिकेतर्फे इयत्ता 7 ते 10 वी पर्यंतच्या मुला-मुलींसाठी "हम होंगें कामयाब"छोटे उस्ताद बाल

कलावंतांकरीता राज्यस्तरीय प्रहसन (स्कीट) स्पर्धा-2025 आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये प्रथम पुरस्कार रुपये 20,000/- व्दितीय पुरस्कार रु.10,000/- तृतीय पुरस्कार रु.5000/- तसेच दोन

उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी रु.3000/- आणि उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, अभिनय मुलगा, अभिनय मुलगी, संगीत,

नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यासाठी प्रत्येकी प्रथम पारितोषिक रु. 2500/-, व्दितीय पारितोषिक रु.1500/-

तृतीय पारितोषिक रु.1000/- अशी एकूण पुरस्काराची रक्कम रूपये 86000/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात

येणार आहे.

या कलाविष्कार घडविणारा, कलागुणांना वाव देणारा, नवनिर्मिती करणारा, नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यामुळे बाल कलावंत, लेखक, दिग्दर्शक, निर्माता घडविण्यासाठी महानगरपालिका सादर करीत आहे, "हम होंगे कामयाब" छोटे

उस्ताद राज्यस्तरीय प्रहसन (स्किट) स्पर्धा-2025.

करीता सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी, नाटय अकादमी, बालनाटय मंडळे यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे

आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow