खोटी बातमी प्रकाशित करणाऱ्या वेब पोर्टलवर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

 0
खोटी बातमी प्रकाशित करणाऱ्या वेब पोर्टलवर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

खोटी बातमी प्रकाशित करणाऱ्या वेब पोर्टलवर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) महाराष्ट्र देशा, Daily Hunt या वेब पोर्टलवर खोटी बातमी दिल्याबद्दल वेदांतनगर पोलिस ठाण्यात भाजपाच्या वतीने लेखी तक्रार देऊन त्या पोर्टलचे मुख्य मालक, संपादक यांच्या विरोधात 171(c), 171(g), 505 IPS प्रमाणे गुन्हा दाखल करावे अशी मागणी पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

एक खोडसाळ, दिशाभूल करणारी, राजकीय फसवणूक व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटी बातमी प्रसिद्ध केली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

उद्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे आणि आज हि संभ्रम निर्माण करणारी बातमी प्रसिद्ध केली आहे.

भाजपा, शिवसेना शिंदे गट व इतर मित्र पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हि निवडणूक लढवली जात आहे. हि जागा शिवसेना शिंदे गट लढवत आहे. महायुती म्हणून भाजपा शिवसेनेचे काम 25 एप्रिल पासून करत आहे. ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी महायुतीचे काम करत असताना खोटी बातमी दिल्याबद्दल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लेखी तक्रारीत डॉ भागवत कराड, अतुल सावे, शिरीष बोराळकर, अनिल मकरीये, जालिंदर शेंडगे यांची सही आहे.

प्रदेश महासचिव संजय केनेकर यांनी सुध्दा लेखी तक्रार दाखल केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow