गुलमंडीत 110 वर्ष जुनी धोकादायक इमारत मनपाने केली जमीनदोस्त...

गुलमंडी भागातील 110 वर्ष जुनी धोकादायक इमारत जमीनदोस्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथक मार्फत आज आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार गुलमंडी भागातील रंगारगल्ली येथील धोकादायक इमारत जी 110 वर्ष जुनी होती ती पाडण्यात आली.
सदर इमारत मालक दूरचंद कल्लूराम मेघावाले नगर भूमापन क्रमांक 43 8 8 अशी असून आकार 12 बाय 15 याप्रमाणे अंदाजीत आहे. संबंधित इमारत ही अतिशय जीर्ण व धोकादायक झाली होती याबाबत संबंधित मालक यांना वेळोवेळी महानगरपालिकेच्या वतीने अधिनियमनुसार धोकादायक इमारत बाबत नोटीस देण्यात आली होती. संबंधित इमारत मालक हे सदर नोटीसला कोणताही प्रतिसाद देत नव्हते. याबाबत सहाय्यक आयुक्त रमेश मोरे ,सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी संबंधितास त्यांचे नुकसान होऊ नये याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या. तरी देखील सदर जागेचे मालक हे मनपास सहकार्य करण्यास तयार नव्हते.
सदर इमारत अतिशय जीर्ण झाली आहे अशा स्थितीमध्ये जर ती बिल्डिंग कोसळली असती तर रंगारगल्ली गुलमंडी हा भाग नेहमीच नागरिकांची वर्दळ असलेला भाग आहे. या बाजार पेठेत दुकानात गर्दी असते. यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये याकरिता आयुक्त महोदयांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ही धोकादायक इमारत पूर्णपणे निष्काशीत करून रस्त्यावर आलेले साहित्य बाजूला करण्यात आले आहे. सदर इमारत तोडताना मालक मेगावाले व परिवारातील सदस्यांनी प्रथम विरोध केला नंतर त्यांना आयुक्तांचे आदेश सांगण्यात आले. सांगण्यात आली. या नंतर महापालिका पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. तसेच याच्या बाजूला इतर पंचवीस दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर जागेचा मोबदला घेऊन ही दहा बाय दहा बाय पंधरा दहा बाय पाच अशा विविध आकारांमध्ये शेड मारून ओटे बांधून दुकाने थाटली होती यांनाही सूचना देण्यात आली होती परंतु त्यांनी सूचनांचे पालन केले नाही किंवा प्रतिसाद दिला नाही म्हणून हे सर्व शेड जेसीबीचे साह्याने निष्काशित करण्यात आले.
रंगार गल्ली ते सिटी चौक ग्रीन हॉटेल ते सिटी चौक पोलीस स्टेशन लगत असलेल्या दुकानावर ही कारवाई करण्यात आली. आज एकूण 25 अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त यांच्या आदेशानुसार उद्याही कारवाई या भागात सुरू राहणार आहे तरी सर्व व्यापारी यांनी रस्त्यावर आलेले धोकादायक बांधकाम धोकादायक शेड व धोकादायक टपऱ्यांचे बांधकाम काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, सहायक आयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमन निरीक्षक सय्यद जमशेद, मुकेश खडसे मजहर अली, रवींद्र देसाई यांच्यासह विद्युत विभागातील कर्मचारी नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी जेसीबी चालक या सर्वांनी कारवाई सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.
What's Your Reaction?






