पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना न्यूट्रीशन फर्स्ट पोषण फर्स्ट

पालकमंत्र्यांच्या हस्ते न्यूट्रीशन फर्स्ट पोषण प्रथम...
या उपक्रमांतर्गत टोफु पनीर डिश व लवकरच होणाऱ्या दिवाळीनिमित्त ऑरेंज मिठाई वाटपास सुरुवात....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)-अन्नामृत फाउंडेशन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संलग्न शाळेतील 35 हजार विद्यार्थ्यांना पनीर /टोफु पनीर आधारित डिशेस वितरित करते. एका दिवसामध्ये 450 ते 500 किलो टोपो पनीरचा उपयोग करून ह्या डिशेस बनवल्या जातात त्या अंतर्गत आज 6 ऑक्टोबर रोजी मटर पनीर डिश बनवण्यामध्ये पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये हा आहार व येऊ घातलेल्या दिवाळीनिमित्त ऑरेंज मिठाई वितरित केली. विद्यार्थ्यांना दिवाळी सणा निमित्त शुभेच्छा ही दिल्या . " इस्कॉनचे अन्नामृत फाउंडेशन कटीबद्धतेने निरंतर अखंडित गुणवत्तापूर्ण पोषण आहार सेवा अशा विविध उपक्रमात सहज देते हे कौतुकास्पद आहे विद्यार्थ्यांना याचा चांगला लाभ होतो"
या मिठाईचे वितरण सर्व 35 हजार विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने या आठवड्यात पूर्ण होईल.
ज्यामध्ये साधारण 900 किलो ऑरेंज मिठाई वितरित होईल.
याप्रसंगी श्री नंदकुमार घोडेले, श्री विकास जैन, श्री त्रिंबक तुपे (माजी महापौर) व श्री राजेंद्र जंजाळ माजी उपमहापौर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री चंद्र प्रकाश त्रिपाठी मुख्य सलाकार बजाज ऑटो, श्री अंकुश पांढरे उप आयुक्त मनपा श्री संजीव सोनार मुख्याध्यापक प्रियदर्शनी मनपा शाळा व विद्यार्थी, इस्कॉन अन्न अमृत तर्फे डाॅ. रमेश लढा ,डॉ. संतोष मद्रेवार श्री राजन नाडकर्णी, डॉ.सुशील भारुका, सुदर्शन पोटभरे अनिल गायकवाड उपस्थित होते.
What's Your Reaction?






