ग्रामरोजगार सेवक यांनी केले लाक्षणिक उपोषण
ग्रामरोजगार सेवक यांनी केले लाक्षणिक उपोषण
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर असलेल्या ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे ग्रामरोजगार सेवक हे गेल्या 17 वर्षांपासून कसलेही फिक्स मानधन मिळत नाही. पूर्णवेळ कर्मचारी म्हणून दर्जा अद्याप मिळालेला नाही. अनेक सुविधांपासून व शासकीय मानधनापासून वंचित आहेत. ग्रामरोजगार सेवक यांना 18 हजार रुपये किमान वेतन द्यावे व पूर्णवेळ कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागणीचा विचार शासनाने केला नाही तर राज्यातील 28 हजार ग्रामरोजगार सेवक तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती शिवाजी गाडे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी विनोद चव्हाण व मोठ्या प्रमाणात ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.
What's Your Reaction?