घाटीत माणूसकी रुग्णसेवा समुहातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

 0
घाटीत माणूसकी रुग्णसेवा समुहातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त दात्यांचे रक्तदान व शासकीय रुग्णालयात गोरगरिबांना महाप्रसादाचे वाटप

सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाँडेशन यांचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबीरात दात्यांनी रक्तदान करून माणुसकी जोपासली. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शासकीय रुग्णालय घाटि येथे उपचार घेणाऱ्या गोरगरीब व त्यांच्या नातेवाईकांना माणुसकी समूहातर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रुग्णालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारो रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. दरवर्षी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते हे 7 वे वर्षे आहे, या कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून लाभलेले किरण बिडवे, पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना, दादासाहेब काळे प्रदेश उप अध्यक्ष नाभिक समाज, प्रा.शरद सोनवणे, यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले, सौ.रुपाली किरण बिडवे व सौ.पुजा सुमित पंडित यांच्या हस्ते संत सेना महाराजांजशची महाआरती करुन या कार्यक्रमाची सुरवात केली. या रक्तदान शिबीरात निलेश जोशी,

दिगबंर सोनटक्के, ज्ञानेश्वर साळुंके, उत्तम काळबंडे, राजु पवार, समाजसेवक सुमित पंडित सह आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूह व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले. त्यामध्ये लक्ष्मण शिंदे,

समाजसेवक सुमित पंडित, अनिल लुनिया,

भरत कल्यानकर बहुद्देशिय सेवाभावी संस्था, कल्पेश पंडित, देविदास पंडित,

समाजसेविका पुजा पंडित, लक्ष्मी पंडित आदिंनी परिश्रम घेतले. रक्त संकलन शासकीय रुग्णालय घाटि रक्त पेढिच्या डॉ. सुनिता बनकर (जनसंपर्क अधिकारी) व रक्तपेढी टिम ने आदिंनी रक्त सकंलन केले.

----------------------------------

रक्तदान शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे असे किरण बिडवे (पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना,) यांनी आव्हान केले.

 रक्ताचा खूप मोठा तुटवडा नेहमी निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी सामाजिक संस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन न घाबरता रक्तदान केले पाहिजे असे मी पोलीस दलातर्फे आव्हान करतो. माणुसकी ग्रुप समाजासाठी खुप छान काम करते. त्यांना समाजासाठी जे सेवाकार्य अविरत पणे चालु आहे ते तरुनांना प्रेरणादायी आहे.असे

   --------किरण बिडवे (पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना,)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow