विविध जाती धर्म संघटनांच्या प्रतिनिधींनी केली सद्भावना मंचची स्थापना

 0
विविध जाती धर्म संघटनांच्या प्रतिनिधींनी केली सद्भावना मंचची स्थापना

विविध जाती धर्म संघटनांच्या प्रतिनिधींनी केली 'औरंगाबाद सदभावना मंच'ची स्थापना

 नसीर अहमद पाशु यांजकडून ...

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोख्याची नितांत गरज लक्षात घेऊन जमाअत ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेतर्फे कटकट गेटजवळील त्या संघटनेच्या स्थानिक कार्यालयात काल (ता. ८ सप्टें.) विविध जाती,धर्म व विचारधारेच्या संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात स्थानिक पातळीवर 'सदभावना मंच'ची स्थापना करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. वारकरी सांप्रदायाचे प्रसिद्ध किर्तनकार माननीय ह.भ.प. निवृत्तीघोडके महाराज यांना सर्वानुमते या मंचच्या अध्यक्षपदी मनोनित करण्यात आले, सचिव म्हणून नसीर अहमद पाशु तसेच उपाध्यक्ष म्हणून बामसेफचे प्रदेश सचिव मा. सिद्धार्थ शिंगारे आणि सामाजिक कार्यकर्ते मिर्झा सलीम बेग यांची नेमणूक करण्यात आली. 

या बैठकीला मुद्दामून अहमदनगरच्या पारनेर येथून आलेले जमाअत ए इस्लामी हिंदच्या सदभावना मंच विभागाचे सचिव डाॅ.सय्यद रफिकपारनेर कर उपस्थित होते. यावेळी बैठकीला संबोधित करतांना डाॅ.सय्यद रफिक पारनेरकरयांनी म्हटले कि, '' कुरआनात अल्लाहने समस्त मानवता एकाच आई बापाची संतती असल्य्याचे म्हटले आहे. या नात्याने आपण सर्व बांधव आहोत. म्हणून एखादा मुसलमान एका हिंदूला आपला भाऊ मानत नसेल तर तो खऱ्या अर्थाने मुसलमानच नसतो.''

बैठकीत जमाअतचे शहराध्यक्ष सलमान मुकर्रम सिद्दीक़ी आणि माजी शहराध्यक्ष इंजि. वाजीद क़ादरी यांनीही आपले विचार व्यक्त केले.

बैठकीत बामसेफ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, सेंटर टू प्रमोट हार्मनी अँड ब्रदरहूड, जमीअत उलेमा ए हिंद, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठाण, तुलसी शिक्षण प्रसारक मंडळ, मदरसा आयेशा सिद्दिका लील बनात, मुप्टा शिक्षक संघटना, राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, वीजडम चॅरिटेबल फाउंडेशन, बुलंद छावा, छावा मराठा युवा संघटना, भारत राष्ट्र समिती, वारकरी सांप्रदा & संत तुकाराम महाराज आश्रम (गंधेली ) येथील वारकरी बांधव, प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टीस, नॅशनल उर्दू टिचर युनियन, भारत मुक्ती मोर्चा, युवक क्रान्ती दल, होल्डिंग हॅन्ड्स, चर्च ऑफ दि क्राईस्ट, राजर्षी शाहू प्रतिष्ठाण, स्वर्ग इंडिया आणि इतर संघटना व चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 बैठकीची अध्यक्षता घोडके महाराजांनी केली. डॉ. सय्यद यांनी प्रास्ताविक केले व शेवटी आभारही त्यांनीच मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नसीर अहमद पाशु यांनी केले. शेवटी सर्व प्रतिनिधींनी एकमेकांचे धरलेले हात उंचावत एकात्मतेचा एक प्रतीकात्मक संदेश दिला. बैठकीनंतर सर्वांनीं सरुची शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow