कटकट गेट येथे मोफत आयुष्यमान व आभा कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद...
कटकट गेट येथे मोफत आयुष्यमान
व आभा कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)— इस्लाम दरवाजा, कट-कट गेट परिसरात समाजसेवक अशफाक जमील खान यांच्या वतीने दोन दिवसीय मोफत आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला शहरातील विविध भागांतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये आजपर्यंत सुमारे 3500 नागरिकांचे आयुष्मान भारत आणि आभा कार्ड तयार करण्यात आले असून, आज एकट्या दिवशी तीनशेहून अधिक नागरिकांचे कार्ड तयार करण्यात आले. आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेवक अशफाक जमील खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे खान यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणाऱ्या मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अशरफ पठाण, शफी भाई, जाकीर भाई, फैसल खान साहेब, हमीद भाई, उमर भाई, अरबाज खान, सरफराज भाई, शेरू भाई, वसीम खान आदींचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाहुण्यांनी अशफाक जमील खान यांचा गुलपुष्पांनी सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.
अशफाक जमील खान म्हणाले, “जनतेच्या सेवेसाठीच आम्ही हे उपक्रम राबवत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा, हा आमचा प्रयत्न असून, जनतेच्या मागणीवरून पुढील काळात आणखी कॅम्पचे आयोजन करण्यात येईल.”
या मोफत कॅम्पमुळे शेकडो गरजू नागरिकांना आरोग्य विमा योजनांचा लाभ मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
What's Your Reaction?