चोरीला गेलेले 35 मोबाईल बेगमपुरा पोलीसांनी मिळवून दिल्याने चेह-यावर हास्य फुलले...!

 0
चोरीला गेलेले 35 मोबाईल बेगमपुरा पोलीसांनी मिळवून दिल्याने चेह-यावर हास्य फुलले...!

चोरीला गेलेले 35 मोबाईल बेगमपुरा पोलीसांनी मिळवून दिल्याने चेह-यावर हास्य फुलले 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेगमपुरा पोलिसांनी नागरिकांना अनोखी आणि गोड भेट दिली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले, फसवणुकीत लुबाडलेले तसेच हरवलेले तब्बल 35 मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर तसेच सहायक पोलीस आयुक्त श्री. सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

विशेष म्हणजे, हस्तगत करण्यात आलेले मोबाईल केवळ छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक, झारखंड आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून शोधून काढण्यात आले. चोरी, फसवणूक आणि हरविलेल्या मोबाईलमध्ये घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईलदेखील समाविष्ट होते.

हस्तगत करण्यात आलेले 35 मोबाईल महिला, वृद्ध, युवक आणि पुरुष अशा विविध नागरिकांना सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या हस्ते परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेकांनी बेगमपुरा पोलिसांचे आभार मानत या कामगिरीचे कौतुक केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या नेतृत्वाखाली हवालदार कचरे, महिला पोलीस कर्मचारी साक्षी संकमवड, पोलीस कर्मचारी सोर यांच्यासह पथकाने यशस्वीपणे पार पाडली

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow