महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दिव्यांगांचा अक्रामक पवित्रा, गेट तोडण्याचा प्रयत्न, काही काळ तणाव, आत जाण्याचा रस्ता केला बंद...
मनपा मुख्यालयाच्या गेटवर दिव्यांगांचा आक्रमक पवित्रा; गेट तोडण्याचा प्रयत्न
5 टक्के निधीच्या मागणीसाठी दोन, कायदा रद्द करण्याची मागणी... दिवसांपासून आंदोलन; मागणी पूर्ण न झाल्यास 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना घेरावाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- महापालिकेच्या दिव्यांगांसाठीच्या 5 टक्के निधीच्या मागणीवरून व नवीन कायदा रद्द करावा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दिव्यांग एकता मंच आक्रमक झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरू असून, बुधवारी आंदोलकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात सर्वपक्षीय दिव्यांग सहभागी झाल्याने एकीकडचा रस्ताही वाहतूकीसाठी बंद केला आहे.
आंदोलनामुळे महापालिका मुख्यालयाचे मुख्य गेट बंद ठेवण्यात आले. त्यामुळे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते तसेच अधिकारी आणि सामान्य नागरिकांना मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
दिव्यांग एकता मंचाने महापालिका प्रशासनाकडे दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधी पूर्णपणे खर्च करावा, तसेच मागील वर्षाचा निधी, उदरनिर्वाह भत्ता, संगोपन भत्ता, शिष्यवृत्ती, तसेच तक्रार निवारणासाठी आवश्यक बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, दिव्यांगांसाठी निधीची तरतूद आणि त्याचा वापर करण्यासंदर्भात शासनाच्या नियमांनुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात दिव्यांग संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही दिव्यांग एकता मंचाने महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
याप्रसंगी दिव्यांग एकता मंचचे अध्यक्ष शेख मुनीर, काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, शहराध्यक्ष जकी मिर्झा बेग, एमआयएम दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मोहसीन खान, शाहेद शेख, सईद खान, सय्यद कलिम टेलर व शेकडो दिव्यांग महापालिकेसमोर ठाण मांडून बसले
आहेत.
What's Your Reaction?