राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून क्रांतीचौकात केले मुक आंदोलन

 0
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून क्रांतीचौकात केले मुक आंदोलन

सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी रस्त्यावर, मुक करत केली मागणी...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज)

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) तर्फे आज सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत क्रांती चौक येथे "मूक आंदोलन" करण्यात आले.

सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाईची मागणी शहर जिल्हाध्यक्ष श्री अभिजीत देशमुख यांच्यातर्फे आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच सरकारने त्या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि दैदिप्यमान असे हजारो वर्षे टिकणारे स्मारक लवकरात लवकर पुन्हा उभे करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,

कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद, पूर्व वि. अध्यक्ष नागेश भालेराव, पश्चिम वि.अध्यक्ष विनोद जाधव, रमेश पुरी, युवक शहराध्यक्ष मयूर सोनवणे, विशाल पुंड गोपाळ खेत्रे, सचिन मिसाळ, रफिक भाईजी, असद पटेल, गौस पठाण, महिला शहराध्यक्ष भाग्यश्रीताई राजपूत, अंकिता विधाते, कविता शिंदे, माधुरी साळुंके, शमा बेग, शिल्पा भोसले, बाळासाहेब पवार, अन्वर शेख, अलींम शेख, पांडू कसबे, विशाल विराळे, अमोल ताठे, शुभम दाभाडे, सागर भारती, शुभम गायकवाड, उमर सौदागर, शुभम साळवे, स्वागत उटीकर, शाम तुपे, पियुष साळवे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow