जन्मप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी मागितली लाच, मनपाचे दोन कर्मचा-यांना रंगेहाथ पकडले...

जन्मप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी मागितली लाच, मनपाचे दोन कर्मचा-यांना रंगेहाथ पकडले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -
तक्रारदार यांच्याकडे जन्मप्रमाणपत्रातील दुरुस्ती करुन देण्यासाठी स्वतः करिता 3 हजार रुपयाची मागणी करुन तडजोडीअंती 2 हजार रुपये स्विकारण्याचे कबूल केले. पंच समक्ष स्विकारली आहे. श्रीमती शोभा मिठू आहेरकर, वय 56, व्यवसाय नोकरी, सफाई मजूर, श्रीमती वर्षा वसंत महिरे, वय 36, व्यवसाय नोकरी, पद सफाई मजूर, मनपा झोन कार्यालय 9, यांना एसिबीने रंगेहाथ पकडले. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीमती माधुरी कांगणे, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत शिंगारे, उप अधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धर्मराज बांगर, सापळा अधिकिरी पोलिस निरीक्षक वाल्मिक कोरे, सापळा पथक पोहवा राजेंद्र जोशी, युवराज हिवाळे, मपोहवा पुष्पा दराडे, आशा कुंटे, पोअंम ही.एन.बागुल यांनी केली आहे.
What's Your Reaction?






