दंगलीतील आरोपीच्या घरातून जादू-टोण्याचे साहित्य, ड्रग्ज मिळाल्याने खळबळ...

 0
दंगलीतील आरोपीच्या घरातून जादू-टोण्याचे साहित्य, ड्रग्ज मिळाल्याने खळबळ...

दंगलीतील आरोपीच्या घरातून जादू-टोण्याचे साहित्य, ड्रग्ज जप्त...

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) - 

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारत त्याच्याकडून ड्रग्ज जप्त केले. या छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा व जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ असे साहित्य काल रविवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकाचे प्रमुख गिता बागवडे व सहका-यांनी छापा मारत साहित्य जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली. नियाज नजीर शेख (35 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.

रविवारी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नियाज शेख हा मुजीब कॉलनीतील त्याच्या घरात ड्रग्जची विक्री करत आहे. या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिस निरीक्षक गीता बागवडे पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी घरात प्रवेश करताच, त्यांना सुरुवातीला काहीच संशयास्पद आढळले नाही. मात्र, बेडरुममधील पलंगाची गादी तपासली असता त्याखाली एका प्लास्टिकच्या पिशवीत एमडी ड्रग्जचा साठा सापडला. धक्कादायक बाब म्हणजे, याच घरातून एक गावठी कट्टा, जनावरांची हाडे, कवटीच्या माळा, कासवाचे हाड, काळ्या जादूसाठी वापरले जाणारे कापडी भुताचे मास्क, हंटर आदी साहित्य पथकाला मिळून आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये दोन वजन काटे, केमिकलच्या बाटल्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या संशयित पावडरचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची किंमत अंदाजे 72 हजार रुपये आहे. पोलिसांनी सर्व वस्तू सीलबंद करून पंचनामा केला असून आरोपीला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का...? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी आरोपी नियाज शेख याच्याविरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow