जम्मू काश्मीर घटना, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना वाहिली श्रध्दांजली
 
                                जम्मू काश्मीर घटना, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, श्रध्दांजली वाहिली...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीय नागरिकांना जीव गमावला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या नागरीकांना मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)औरंगाबाद शहर जिल्हा तर्फे जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात पर्यटनास गेलेले भारतीय देश बांधव मृत्युमुखी पडले. देशात आतापर्यंत कधी नव्हे असा हल्ला काश्मीर येथे घडला.
याचा निषेध व्यक्त करण्यात आला व मृत्यूमुखी पडलेल्या देश बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळेस जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष ख्वाॅजा शरफोद्दीन मुल्ला व मा.आ.संजय वाघचौरे यांनी निषेध व्यक्त केला. व मोमबत्ती पेटवून मौन धारण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय सचिव विनाताई खरे, श्रीमती गजल जमादार, युवक अध्यक्ष प्रशांत जगताप, युवक कार्याध्यक्ष शेख फारूक, शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान, पश्चिम वि.स.म.संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, महिला अध्यक्षा शकीला बाजी, यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            