जिल्ह्यात खताची टंचाई, काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्भवलेल्या खतांच्या टंचाईबाबत काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) -
केंद्र सरकारने आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर केलेला खताचा पुरवठा (अलोकेशन) प्रत्येक महिन्याला ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी वितरण करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे. तसेच पुरेशा खत पुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना दूर-दूरुन व चढ्या भावात खत खरेदी करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून जाते त्यांची आर्थिक फरफट होत आहे.
तसेच खते वेळेवर पिकांना न मिळाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो व यामुळे सरकारच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहे.
खताबरोबर आवश्यक नसणारे औषधी सक्तीने घ्यावेच लागतात हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. ते सुद्धा सरकारचा स्वतःच्या कंपन्यांकडून युरिया (DAP) जोडून देतात हे शेतकऱ्यांना त्रासदायक होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाअध्यक्ष शेख युसूफ, विलास बापू औताडे, अशोक डोळस, ऍड. सय्यद अक्रम, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, विनोद तांबे, जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शेख कैसर बाबा, सूर्यकांत गरड, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सय्यद फराज आबेदी, संतोष मेटे, राहुल सावंत, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, अकिल पटेल, मोईन कुरैशी, पप्पू ठुबे, सोमनाथ पळसकर, पंढरीनाथ जाधव, अब्बास भाई, संतोष शेजुळ, नदीम सौदागर, डॉ.अरुण शिरसाट, सय्यद फय्याजोद्दीन, शेख मुबीन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






