जेष्ठ निवृत्त कार्यकारी अभियंता सय्यद अथर हुसेन यांचे निधन

 0
जेष्ठ निवृत्त कार्यकारी अभियंता सय्यद अथर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ निवृत्त कार्यकारी अभियंता सय्यद अथर हुसेन यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डी-24 न्यूज) – शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ नागरिक तथा सिंचन विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सय्यद अथर हुसेन (वय 87, रा. दिलरस कॉलनी, औरंगाबाद) यांचे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

सय्यद अथर हुसेन यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात जायकवाडी धरण प्रकल्प तसेच वाल्मी कार्यालय येथे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

ते वंडर प्लायवुड, वंडर ट्रॅव्हल्स, वंडर पेट्रोल पंप आणि वंडर ग्रुपचे संचालक सय्यद जाकिर हुसेनी, सय्यद ताहिर हुसेनी, सय्यद शाकीर हुसेनी आणि सय्यद आमिर हुसेनी यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली आणि मोठा परिवार आहे.

त्यांची जनाजाची नमाज गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी जामा मस्जिद, बुड्डी लेन येथे अदा करण्यात आली. त्यानंतर पंचकुवा कब्रस्तान, किल्लेअर्क येथे त्यांचा दफनविधी पार पडला.

अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौस अता करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow