डॉ.जीवनसिंग राजपूत हे समाजात गैरसमज व संभ्रम पसरवत आहेत - भरतसिंग राजपूत

 0
डॉ.जीवनसिंग राजपूत हे समाजात गैरसमज व संभ्रम पसरवत आहेत - भरतसिंग राजपूत

डॉ.जीवन राजपूत हे समाजात गैरसमज पसरवत आहे - भरतसिंग राजपूत

समाज त्यांच्या पाठीशी नाही केले स्पष्ट....

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) डॉ. जीवनसिंग राजपूत हे राजपूत समाजात गैरसमज पसरवत आहेत. शहरात मे महिन्यात झालेल्या सकल राजपूत समाजाचा महामेळावा झाला होता यामध्ये समाजातील प्रत्येक व्यक्तीने परिश्रम घेत हा मेळावा यशस्वी केला. समाजाचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लागावे हा उद्देश या मेळाव्याचा होता. श्रेय घेऊन राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न डॉ.जीवनसिंग राजपूत करत आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहायचे असल्यास राहावे त्यांचा तो अधिकार आहे परंतु समाजात संभ्रम निर्माण करु नये दिशाभूल करु नये, वेठीस धरू नये, यामुळे समाजाने जागृत राहून अशा गैरसमजाला बळी पडू नये. डॉ.राजपूत हे लोकसभेमध्ये राजपूत समाजाचा उमेदवार दर्शवत आहे. लोकसभेच्या उमेदवारासाठी सामाजिक कार्य म्हणून स्वघोषित उमेदवाराकडे फक्त राजपूत समाजाचा महामेळावा या व्यतिरिक्त काय भांडवल आहे...? अयोध्या नगरी मध्ये राजपूत समाजाचा महामेळावा संपन्न करताना राजपूत समाजाचा उमेदवार राहणार आहे असे उद्दिष्ट ठेवून आपण महामेळावामध्ये भाग घेतला होता का...? असे प्रश्न उपस्थित करत पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत व राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे माजी नगरसेवक कवरसिंग बैनाडे यांनी हि माहिती दिली.

राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले की राजपुत समाजातील अनेक लोक विविध पक्षात सक्रिय आहेत. डॉ.जीवन राजपूत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तरी आम्ही पक्षाशी बांधील आहोत त्यांचे प्रचार करणार नाही.

यावेळी राजेश सुर्यवंशी, देविसिंह बारवाल, पदम राजपूत आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow