तथाकथित डाॅन दिवंगत बाबा फरजंद यांच्या बंगल्यात छापा, मिळाले पाच कोटींचे घबाड, पिस्टल, काडतूस, तलवारी...!

 0
तथाकथित डाॅन दिवंगत बाबा फरजंद यांच्या बंगल्यात  छापा, मिळाले पाच कोटींचे घबाड, पिस्टल, काडतूस, तलवारी...!

तथाकथित डाॅन दिवंगत बाबा फरजंद यांच्या बंगल्यात 5 कोटी रोख, पिस्टल, काडतूस, तलवारी जप्त...!

बाबा फरजंद हे त्या काळातील तथाकथित डाॅन आहे. एका महीन्यापूर्वी त्यांचा आजारपणामुळे निधन झाले. कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्याकाळी काम केले तर एकदा विधानसभा निवडणुकीत सुद्धा उभे राहिले होते.... तात्कालिक नेते, समाजसेवकांचे त्यांच्या घरी येणे जाणे होते... आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगल्यावर धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - सन 1980-1990 च्या दशकात शहरात दहशत, दबदबा व राजकीय आणि कामगार क्षेत्रात काम केलेल्या तथाकथित डाॅन दिवंगत बाबा फरजंद यांच्या मिटमिटा येथील एका एकरवर बांधलेल्या बंगल्यात गुप्त माहितीच्या आधारावर आर्थिक

गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात बेहिशेबी रोख रक्कम 5 कोटी 26 लाख 29 हजार रुपये ज्यामध्ये 10, 20, 50, 100 च्या नोटा मिळून आल्या आहेत. ह्या नोटा मोजण्यासाठी पाच ते सहा मशिनचा वापर करण्यात आल्या. 10 जुलै रोजी हि कारवाई करण्यात आली. 21 तास त्या बंगल्यात कार्यवाही सुरू होती. बंगालमधून शिला साळवे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कार्यवाईत रोख रक्कम, 6350 जीवंत काडतुसे, दोन पिस्टल, 4 रायफल ज्यामध्ये 6 शस्त्र यांमधून 4 चा परवाना घेतला आहे. तलवारी, चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे. उशिरा रात्री छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळून आलेल्या मुद्देमाल व शस्त्र याबाबत छावणी पोलिस अधिक तपास करत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत डिसीपी शशिकांत सातव यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow