मोटारसायकल चोरणारा सराईत आरोपिस मुकुंदवाडी विशेष पथकाने केली अटक

 0
मोटारसायकल चोरणारा सराईत आरोपिस मुकुंदवाडी विशेष पथकाने केली अटक

मोटारसायकल चोरणारा सराईत आरोपिस मुकुंदवाडी विशेष पथकाने केली अटक

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) मुकुंदवाडी विशेष पथकाने सराईत मोटारसायकल चोराकडून 11 मोटारसायकल जप्त केले आहे.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली HF Deluxe हि गाडी पोलिस स्टेशन मोजपुरी, जिल्हा जालना येथे आहे. पोलीस निरीक्षकांनी विशेष पथकाला पाठवले. अजय विजय वाकडे याला विचारपूस केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. सातारा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. अंबिकानगर मुकुंदवाडी, हर्सुल, सातारा, वाळूज परिसरातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपिवर जवाहरनगर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची कसून विचारपूस केली असता सहा लाख रुपयांचे 11 मोटारसायकल पथकाने हस्तगत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow