तलाठ्याने मागितली जमीनीचा फेरफार करण्यासाठी लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...
तलाठ्याने मागितली जमीनीचा फेरफार करण्यासाठी लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सिल्लोड, दि.8(डि-24 न्यूज) - जमीनीचा फेरफार करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अडकला आहे. प्रशांत रमेश देवगया, वय 34, पद तलाठी, सजा केळगांव, तालूका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे लाच स्वीकारणा-या तलाठ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांची पत्नीच्या नावे खरेदी दस्त क्रमांक 67 गट क्रमांक 551 केळगांव येथील एक गुंठा जमीन खरेदी केली आहे. फेरफार मंजूरी करुन सातबारावर नोंद करुन नाव आणण्यासाठी तलाठ्याने 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. केळगांव येथे जाऊन त्यांची तक्रार दोन पंचासमक्ष तक्रारदाराकडे त्यांचा फेरफार मंजूर करून नाव आणण्यासाठी 7 हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती पंचा समक्ष 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली. अंगझडतीमध्ये 5 हजार रुपये तसेच स्वतःचे 400 रुपये व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची घर झडती प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदरील कारवाई सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक केशव नाना दिंडे, पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर, तपास अधिकारी शांतीलाल चव्हाण यांनी केली आहे.
What's Your Reaction?