बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी तालूका आरोग्य अधिका-यांसह एकाचा अटकपूर्व जामिन नामंजूर तरीहि अटक नाही...

 0
बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी तालूका आरोग्य अधिका-यांसह एकाचा अटकपूर्व जामिन नामंजूर तरीहि अटक नाही...

बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह एकाचा अटकपूर्व जामीन नामंजुर.

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)

बनावट पदवी घेतल्याचा आरोप करुन तोतया डॉक्टर असल्याचे सांगत शासकीय सेवेतुन निष्कसित केल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉकट सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्या दाखल गुन्ह्यप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने अटक पुर्व जामीन फेटाळुन देखील संबंधितांना पोलिस प्रशासन अटक करण्यासाठी धजावत नसल्यामुळे आश्र्चय व्यक्त होत आहे.

डॉक्टर मोहसिन खान हे शासकीय सेवेत वैद्यकिय अधिकारी म्हणून अंधारी, आमठाणा, पानवडोद, शिवना येथे कार्यरत होते. त्यांचा कामाचा अनुभव व जनसंपर्क पाहाता कोरोना काळात तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉकट सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांनी वैद्यकिय पदवी बनावट असल्याचा ठपका ठेवत बोगस डॉक्टर भासवून डॉक्टर मोहसिन खान यांना शासकीय सेवेतून निष्काशीत केले होते. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके हे वैद्यकिय रजेवर असतांना डॉक्टर मोहसिन खान यांचे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्याशी संगनमत करुन बोगस कागदपत्र तयार केले. व ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेले नाही. त्याठिकाणी पाठवून तत्कालीन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यावर दबाव आणून डॉक्टर मोहसिन खान यांच्या विरुध्द दि.१८.०४.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर डॉक्टर मोहसिन खान यांना अटक पूर्व जामीन मंजुर होवून पोलिस झडतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधारक शेळके यांच्या निवास्थानामधून डॉक्टर मोहसिन खान यांचे मुळ कागदपत्र ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणानंतर डॉक्टर मोहसिन खान यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अधिकारी यांच्याकडे संबंधिताच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. डॉक्टर मोहसिन खान यांच्या तक्रारी नंतर पोलिस उपआयुक्त यांनी छावणी पोलिस स्टेशन ला डॉ. मोहसिन खान यांच्या अर्जावर चौकशी करण्याची सांगितले. चौकशी झाल्यानंतर सुध्दा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविलेला नाही. गुन्हा दाखल न झाल्याने डॉक्टर मोहसिन खान यांनी जिल्हा सत्र न्यायालय येथे अपिल दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशाने संबंधिता विरुध्द दि. २४.०४.२०२५ रोजी भा.द.वि.४६५, ४६७, ४७१, ४२०, २०१, १२० (ब) व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉकट सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्यावर फसवणूक, बनावट शैक्षणिक कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधितानी दाखल केलेले अटक पुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने दि. ०९.०५.२०२५ रोजी फेटाळत पोलिस यंत्रनेस संबंधितास अटक करण्याचे आदेश पारीत केले.

(एवड्या घडामोडी नंतर ही पोलिस यंत्राना कमलिची ढिम्म असून आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न पोलिस प्रशासनाकडुन होत आहे की, काय अशी शंका येते. माझ्यासारख्या प्रमाणिक व्यक्तींना न्यायालय न्याय देत असतांना पोलिसांनी अन्या कारक वागु नये व आरोपींना पाठीशी घालू नये अशी माफत अपेक्षा डॉक्टर मोहसिन खान यांनी व्यक्त केली.)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow