त्रिमूर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

 0
त्रिमूर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

त्रिमूर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर, दि.2(डि-24 न्यूज)- त्रिमूर्ती चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर थधारदार कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. रोहन गवळी (वय 33, रा. मेसखेडा, ता. मंठा, जि. जालना, सध्या रा. शांतीनिकेतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता फिर्यादी अरुण उत्तम जोगदंडे (वय 39, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) हे त्रिमूर्ती चौक येथे त्यांचा मित्र अरुण कथार याच्यासोबत बोलत उभे होते. त्यावेळी अचानक कोणीतरी मागून आल्याचे जाणवल्याने त्यांनी मागे वळून पाहिले असता रोहन गवळी हा हातात कोयता घेऊन दिसला.

रोहन गवळी याने कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो वार हाताने अडवल्याने त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने पुन्हा कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या व उजव्या हातावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.

जखमी अरुण जोगदंडे यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 376/2026, कलम 109(1) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. 29 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 2 वाजता पोलिसांना आरोपी रोहन गवळी हा शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील एका कार पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने फिर्यादी अरुण जोगदंडे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजसाहेब वाघ, पोहेकॉ मारोती गोरें, पोहेकॉ राजेंद्र शिंदे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow