थकीत करासाठी मोहिम जोरात, आज पुन्हा दोन दुकाने सिल केल्याने खळबळ
मालमत्ता कर वसुलीसाठी दोन दुकाने सील...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक कर थकलेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता, दुकाने सील केली जात आहेत.
झोन एकच्या पथकाने मंजूरपुरा येथील 1, सराफा, मुलंमची बाजार 1 व सिराज टॉवर लोटाकारंजा येथील 1 असे 3 दुकाने सिल करण्यात आले.
आयुक्त तथा प्रशासक जी.
श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा कर संकलक व निर्धारक अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन एकचे सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या वसुली पथकाने एक लाखापेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर असलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई केली. मंजूरपुरा येथील शेख रहिमोद्दिन शेख गयासोद्दिन यांच्याकडे 2,66,042 /- हजाराचा थकीत कर, सराफा मुलमची बाजार भागातील प्रकाश बाबुराव जाधव यांच्याकडे 3,54,846/- रुपये व सिराज टॉवर ,लोटाकारंजा येथील शाह गुलाब कादरी यांचे कडील मालमत्ता कर रू.1,57,236/- थकीत असल्याने एकूण 3 दुकाने
सील करण्यात आली होती या पैकी सिराज टॉवर ,लोटाकारंजा येथील शाह गुलाब कादरी यांनी धनादेश द्वारे कराचा भरणा केला आहे.
त्यामुळे एकूण 2 दुकाने सिल करण्यात आली आहेत.
सदर कारवाई वसुली पथकातील कर निरीक्षक अविशान मद्दी, लिपीक रवींद्र आदमाने, अशोक वाघमारे, अमित रगडे, बबन जाधव, मोहम्मद अन्सारी, विवेक जाधव, हमीद मामु आदी कर्मचारी यांनी के
ली.
What's Your Reaction?