थकीत मालमत्ता कर 14 नळ कनेक्शन कट, कचराही उचलणार नाही...!

 0
थकीत मालमत्ता कर 14 नळ कनेक्शन कट, कचराही उचलणार नाही...!

थकीत मालमत्ता कर 14 नळ खंडित...

मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करेपर्यंत कचरा उचलला जाणार नाही

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

एक लाखावरील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करिता संबंधित मालमत्ता धारकांची मालमत्ता सिल करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.

या अनुषंगाने आज 

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे आदेशानुसार, उपआयुक्त - 2 अपर्णा थेटे , सहाय्यक आयुक्त -4 अशोक गिरी, कर अधिक्षक अजय भोसले यांचे मार्गदर्शनाखाली झोन क्र 4 कार्यालय अंतर्गत N f-sector, N-12 चेअरमन नायर मोहम्मद को. ऑ. हौ. सोसायटी, रोजेबाग, सिडको, येथील मालमत्ता थकबाकी रुपये 775047/- व पाणीपट्टी थकबाकी रुपये, 448394/- थकबाकी असल्यामुळे या बाबतीत वारंवार भरणा करण्यासाठी वेळोवेळी सांगीतले असता मालमत्ता धारकांनी भरणा केला नसल्यामुळे एकुण 14 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. तसेच ड्रेनेज चोकअप करण्यात आलेले असून जो पर्यंत मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणा करीत नाही तोपर्यंत कचरा पण उचलून घेतला जाणार नाही असे संबंधित सोसायटीला सांगितले आहे. 

सदर कार्यवाही अब्दुल हसीब, वसुली कर्मचारी बाबर चाऊस व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी पार पाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow