दहावी बोर्ड परीक्षेत मुलींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल घसरला...
दहावी बोर्ड परीक्षेत मुलींचीच बाजी, 92.09 टक्के लागला निकाल...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- अकरावीचे वर्ग लवकर सुरू व्हावे यासाठी दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दहा दिवस अगोदर लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केला आहे. या निकालाचे विश्लेषण केले आहे मुलांपेक्षा यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करुन मुलांपेक्षा अधिक यश संपादन केले आहे. राज्याचा एकूण निकाल 92.09 लागला आहे.
फेब्रुवारी - मार्च 2026 दहावी बोर्ड परीक्षेत बसलेल्या मुलींमध्ये 94.96 विद्यार्थीनी तर मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला आहे. यामुळे मुलींची सरशी या निकालात दिसून येत आहे.
कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावून तेथे 97.62 निकाल लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के निकाल लागला आहे.
राज्यात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर , नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 15 लाख 42 हजार 472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यावर्षी 6612 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांकणासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह पध्दतीचा वापर करण्यात आला. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करून करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
विभागनिहाय दहावीचा निकाल...
कोकण - 97.62 टक्के
कोल्हापूर - 95.47
मुंबई - 94.97
पुणे - 94.24
नाशिक - 90.53
अमरावती - 90.50
नागपूर - 89.07
लातूर - 88.42
छत्रपती संभाजीनगर - 88.41
What's Your Reaction?