नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार...!

 0
नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार...!

नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार...

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिल्या शुभेच्छा...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा रविवार, 22 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी समर्पण भावनेने कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या. 

सहसंपर्क संघटक आनंदीताई अन्नदाते, सुनिताताई देव, अनिताताई मंत्री, दुर्गाताई भाटी, जिल्हा संघटक आशाताई दातार, लताताई पगारे, राखीताई परदेशी, जिल्हा समन्वयक विद्याताई अग्निहोत्री, देवयानीताई डोणगावकर, नंदाताई ठोंबरे, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता औताडे, वैशाली आरट, उपजिल्हा संघटक ठकुबाई कोथंबिरे, विधानसभा संघटक कविता सुरळे, मीरा देशपांडे, सीमा खरात, राजश्री राणा, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी व अंजना गवई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

हिंदूहद्यसम्राट, शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपली सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी सोपवली असून या संधीचे पक्षाच्या बांधणीच्या कामकाजात रूपांतर करा असे, आवाहन दानवे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केले. 

कर्तुत्ववान आणि सक्षम पदाधिकाऱ्यांची या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. निश्चितपणे आगामी काळात आपण सर्व पदाधिकारी मजबूत पणे पक्षाची ध्येय आणि धोरणे गाव व वॉर्डापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करत नवनवीन संकल्पना, सातत्याने गाव पातळीपर्यंत भेटी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि वेगवेगळे कार्यक्रम राबविण्याची सूचना यावेळी अंबादास दानवे यांनी केली. 

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, ती सार्थ ठरवू. आगामी काळात विधानसभा निवडणुकीत तसेच पुढेही पक्षात्मक बांधण्यासाठी अविरत कार्य सूरू राहिलं, असे आश्वासन देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा आमचा संकल्प असून या कार्यासाठी येणाऱ्या काळात निष्ठापूर्वक काम करू, अशी एकसुराने महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त केली. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक डॉ. शोएब हाश्मी, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, चंद्रकांत गवई, कृष्णा पाटील डोणगावकर, विधानसभाप्रमुख राजू शिंदे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमूख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, नंदकिशोर जाधव व दिपक पवार, माजी महापौर अनिताताई घोडेले, तालुका संघटक वर्षा जाधव, रुपाली मोहिते, भागू आक्का शिरसाठ, रेखा शहा, स्वाती माने, सुनिता पाटील, राखी सुरडकर, पुष्पा नलावडे, रंजना कोलते, अनिता खोंडकर, कविता मठपती, विजया पवार, वंदना पवार, मीना थोरवे, सुमित्रा हाळनोर, वंदना गवळी, रोहिणी काळे, वैशाली दांडेकर, मीना यादव, आरती यादव, आरती साळुंखे, मनीषा खरे, मीना खोतकर, लता शंखपाळ, जमनाबाई ठाकूर, मनीषा ठाकूर, स्वाती देशमाने, शोभा साबळे, सारिका शर्मा, स्वाती गणोरकर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow