नवाबपू-यातील म्हशीच्या गोठा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नवाबपुऱ्यातील म्हशीच्या गोठा मालका विरूद्ध गुन्हा दाखल...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नवाबपुरा येथील म्हशीचा गोठा मालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नावाबपुरा येथील छोटे खान बाब खान यांच्या बेकायदेशीर म्हशीचा गोठ्या मुळे परिसरातील नागरिकांना यामुळे होणाऱ्या दुर्गंधी मुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता यामुळे त्यांनी सदर गोठा स्थलांतरित करणे बाबत महानगरपालिके कडे अर्ज दाखल केला होता. याची दखल घेत आज पशुधन पर्यवेक्षक लक्ष्मण फुले व पथक सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठीं गेले असता गोठ्यात शेण, मलमुत्र, जमा करून घाण साठवून ठेवल्याचे आढळून आले. या अगोदर सबंधित गोठे मालकास दोन नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही संबंधितांनी सदर गोठा शहरा बाहेर हलविला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सबंधित गोठा मालक छोटे खान बाब खान वय वर्ष 45 ,रा.नवाब पुरा, प्रिन्स हार्डवेअरच्या बाजूला यांचे विरूद्ध म्हशीचे शेण साठवून परिसरात दुर्गंधी कीटक यांच्या उत्पत्तीस कारणीभूत होऊन रोग पसरविण्याचे कृत्य करणे या बाबत मनपा अधिनियम मुंबई प्रांतिक अधी 1949 चे कलम 376(01) अनुसूची चे ( शेड्युल) प्रकरण 14 चे नियम 05 व 22 चे अधिसूचनेचे उल्लंघन करून सार्वजनिक लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्यांचे विरुद्ध कलम 223 271 BNS प्रमाणे जिन्सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्र.पशू वैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांनी दिली आहे.
What's Your Reaction?