नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलची अंबादास दानवेंनी केली पाहणी

 0
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलची अंबादास दानवेंनी केली पाहणी

नवीन पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलची अंबादास दानवेंनी केली पाहणी

पैठण, दि.24(डि-24 न्यूज) संभाजीनगर महानगरपालिकेसाठी मंजूर नवीन पाणी पुरवठा (अमृत 2.0) योजनेची जायकवाडी येथील जॅकवेल व 39 किलोमीटर पाईपलाईनची शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 24 एप्रिल रोजी स्थळ पाहणी केली. शहराच्या पाणी पुरवठा निमित्त नव्याने होत असलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी तसेच अद्यापपर्यंत झालेल्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेऊन प्रशासनाला येणाऱ्या अडचणीची माहिती घेण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी दिली. 

संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी पुढील 50 वर्षाच्या भविष्याच्या दृष्टीने 2500 हजार मिलिमीटर व्यासाची ही योजना एक मोठा प्रकल्प आहे. सदरील योजनेचे सुरू असलेल्या कामकाजाच्या वेळेस प्रशासनासमोरील अडचणी समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या योजनेचे आगामी काळातही काम जलद गतीने सुरूच ठेवण्यात यावे, अशी सूचना अंबादास दानवे यांनी यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना केली. 

संभाजीनगर नवीन पाणी पुरवठा योजना आगामी 50 वर्षाच्या भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. सदर प्रकल्प मोठा असल्याने याच्या कामात अनेक अडथळे येत असतात. अनेकदा कामगारांच्या उपलब्धता नसते, त्यामुळे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापूर्वी हे काम होणे शक्य नाही. तसेच सदरील योजना पूर्ण करण्यास महानगरपालिका 850 कोटी रुपये कर्ज स्वरूपात घेणार असल्याचे मनपा आयुक्त यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मनपा आयुक्त जी.श्रीकांत, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, दत्ता गोर्डे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, तालुकाप्रमुख मनोज पेरे पाटील, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, नंदू लबडे व दिनेशराजे भोसले उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow