नवीन वर्षाचे स्वागत आणि उद्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही
नवीन वर्षाचे स्वागत आणि जुन्या शहरातला उद्या पाणि नाही
औरंगाबाद, दि 31(डि-24 न्यूज) जायकवाडी ते औरंगाबाद पर्यंत येणारी 700 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन मध्ये मोठे लिकेज झाल्यामुळे उद्या जुने शहराला पाणीपुरवठा होणार नाही. आज शहर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असताना उद्या नळाला पाणी येणार नाही यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागणार आहे. जायकवाडी ते औरंगाबाद पर्यंत येणारी 700 मिलिमीटर वयासाची सीआय पाईपलाईन मध्ये पाच मोठे लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने उद्या दिनांक 1 जानेवारी रोजी लिकेज दुरुस्तीसाठी किमान दहा तासाचा शट डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे या पाईपलाईन मार्फत पाणीपुरवठा होत असलेले शहरातील जुने भागात उद्या पाणी येणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.
ढोरकिन पंप हाऊस, ढोरकिन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाकेफळ फाटा, फरशीनाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी मोठे लिकेज झाले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होता यामुळे यांची दुरुस्तीसाठी सदरील पाईपलाईन किमान 10 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित विभागातर्फे देण्यात आलेली आहे.
What's Your Reaction?