नामांतराची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, 25 जानेवारीला सुनावणी
नामांतराची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, 25 जानेवारीला सुनावणी
मुंबई, दि.22(डि-24 न्यूज)
औरंगाबादे शहराच्या नामांतरावरावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होती पण ती आज होऊ शकली नाही. पुढील सुनावणी 25 जानेवारीला होईल अशी माहिती याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
आज न्यायालयात सरकारी वकील सराफ यांनी न्यायालयाला विनंती केली की सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात यावी. न्यायालयाने हि विनंती मान्य करत पुढील तारीख दिली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे. यावेळी आज सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर, जेष्ठ विविज्ञ एस.एस.काझी, त्यांचे असि. एड मोईन शेख व याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी उपस्थित होते.
What's Your Reaction?