नामांतरावरावर मुश्ताक अहमद यांची भुमिका बदलली का...?
 
                                नामांतरावरावर मुश्ताक अहमद यांची भुमिका बदलली का...? बॅनरवर छत्रपती संभाजीनगर
औरंगाबाद, दि.22(प्रतिनिधी) औरंगाबाद नामांतरावर मुश्ताक अहमद यांची भुमिका बदलली का असा प्रश्न विचारला जात आहे. राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले आहे. नामांतराला मुश्ताक अहमद यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुश्ताक अहमद हे स्वतःला मुख्य याचिकाकर्ते म्हणून संबोधित करता आणि असे असताना त्यांच्या बॅनरवर छत्रपती संभाजीनगर लिहिले असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. 20 नोव्हेंबर रोजी जालना रोड वर जायकवाडीत हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. जालना रोडवर राष्ट्रवादी, शरद पवार गटाच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये माजीमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुश्ताक अहमद, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांचे छायाचित्र आहे. या बॅनर बघून शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे की मुश्ताक अहमद यांनी आपली भूमिका बदलली का...? त्यांच्या फेसबुक पेज वर सुद्धा हा बॅनर झळकत आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर हे नाव मान्य आहे का...मग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा अर्थ काय काढावा. अजून निर्णय आले नसताना नामांतरावराला अगोदर विरोध करणारी राष्ट्रवादी सर्रासपणे बॅनरवर छत्रपती संभाजीनगर लिहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुश्ताक अहमद यांची नियुक्ती अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष पदी केली आहे. दोन भुमिका या पक्षाचे कशासाठी अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी भवन येथे याअगोदर पण बॅनरवर शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर लिहिले असताना आपल्या भाषणात एक शब्द सुद्धा मुश्ताक अहमद बोलले नाही
 
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            