नारेगावाच्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढले, घनसावंगीत खून झाल्याचा संशय, नातेवाईकांची तक्रार
नारेगावच्या तरुणाचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले, घनसावंगीत खून झाल्याचा संशय, नातेवाईकांची तक्रार
बायजीपूरा येथील गंजेशहीदा कब्रस्तानातून काढला मृतदेह....
औरंगाबाद, दि.23 (डि-24 न्यूज) बायजीपूरा येथील गंजेशहीदा कब्रस्तानातून 19 वर्षीय युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस दाखल झाल्याने खळबळ उडाली. जशी एम्बूलन्स कब्रस्तानात घुसली यावेळी मोठा जमाव तेथे जमा झाला होता. युवकाचा दफनविधी 17 नोव्हेंबर उशिरा रात्री 3 ते 4 वाजता करण्यात आला होता असे त्याचे वडीलांनी यावेळी सांगितले.
शहजाद सालेह फरहान बिनहीलाबी, वय 19, राहणार संजयनगर हल्लीमुक्काम नारेगाव याचे मृतहेद आज 23 नोव्हेंबराला गंजेशहीदा मस्जीद येथील क्रबस्थानातून बाहेर काढण्यात आले. 17 नोव्हेंबरला शहजाद घनसावंगीला त्याचा आत्याच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने स्वत: चाकू मारून आत्महत्या केली असे त्याच्या आतेमामाने शहजादचे वडील फरहान बिनहीलाबी यांना फोन करुन सांगितले. रात्रीच्या वेळी मृतदेह शहरात येथे आणून गंजेशहीदा मस्जिद येथील कब्रस्थानात दफनविधी उरकून घेतला होता.
परंतु शहजादने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली. त्याचा तपास व्हावा अशी तक्रार नातेवाईकांनी घनसावंगी येथे केली. त्यामुळे आज दुपारी घनसावंगी येथील फॉरेनसिकच्या पथकाने शहजादचा मृतहेद बाहेर काढला. दुपारपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहे. हत्या की आत्महत्या हे चौकशी झाल्यावर समोर येईल. आत्महत्या केली असेल तर त्यांचे कारण काय आणि हत्या झाली असेल तर का करण्यात आली ते पोलिस तपासात निष्पन्न होईल.
मृतदेह काढण्याची कारवाई सुरू असताना बाजयीपुरा कब्रस्तानच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. मृतक शहजाद याचे काका महंमद सालेह बिन हिलाबी राहणार करीम कॉलनी, रोशन गेट यांनी शहजादची हत्या मोहीद अलयाफई, सालेह अलयई राहणार घनसावंगी यांनी केली असा आरोप केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करुन शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे.
What's Your Reaction?