खैरेंना उमेदवारी मिळणार का...? दानवे उतरणार मैदानात
खैरेंना उमेदवारी मिळणार का...? दानवे उतरणार मैदानात...
रायगडहुन अनंत गिते यांची उमेदवारी जाहीर होताच इच्छूक लागले कामाला... उमेदवारी कोणाला मिळणार राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अनंत गिते यांची उमेदवारी जाहीर होताच विविध लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने रायगडची उमेदवारी जाहीर करुन तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनंत गिते यांना उमेदवारी देऊन तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः गिते यांनी हि माहिती माध्यमांना दिली आहे. रायगड येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे हे आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष असते. मागिल निवडणुकीत थोड्या मताने पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले जनतेची इच्छा आहे मलाच उमेदवारी मिळावी. नेहमी जनतेच्या सेवेत व सक्रीय असल्याने उमेदवारी मला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर एकदा मोर्चात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आले असताना गुलमंडी येथे झालेल्या जाहीर सभेत उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना मिळेल असे जाहीर केले होते परंतु मागिल पाच वर्षांपासून विरोधीपक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा तयारीला लागले आहे. युवा नेतृत्व लोकसभा असलेले दानवे मतदारसंघात दौरे, विविध पक्ष संघटनेचे कार्यक्रम घेत जनतेशी ते नाळ बांधून आहे. खैरे असो की दानवे यांचे मातोश्रीवर वजन आहे. दोन्ही नेत्यांनी पक्षात फुट पडली तरीही शिवसेनेशी एकनिष्ठ राहुन उध्दव ठाकरे यांची साथ सोडली नाही. पण उमेदवारी कोणाला मिळणार याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मातोश्रीचे आशिर्वाद कोणाला मिळेल हा येणारा काळच ठरवेल. आताची राजकीय परिस्थिती बघता खिचडी झाली असल्याने कोणता उमेदवार कोणाकडे, कोणाला पसंती मिळेल संभ्रमावस्था आहे. महायुतीमधून अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांनीही फिल्डिंग लावली आहे की त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड पण भाजपाच्या वतीने इच्छुक आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना त्यांनी अगोदर पासून तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे पैठणचे आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे सुध्दा शिवसेनेच्या वतीने इच्छुक आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या समोर आव्हान उभे करण्यासाठी इच्छूकांची संख्या वाढत आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी व मनसे, एमआयएम या प्रमुख पक्षांचे उमेदवार लोकसभेच्या मैदानात असतील असे चित्र यावेळी दिसत आहे.
What's Your Reaction?