नाही म्हणणारे अजित पवारांची बारामतीतून उमेदवारी जाहीर, दोनच मुस्लिम नेत्यांना तिकीट...!
 
                                नाही म्हणणारे अजित पवारांची बारामतीतून उमेदवारी जाहीर, दोनच मुस्लिम नेत्यांना तिकीट...!
कागलमधून हसन मुश्रीफ तर मुंब्रा-कळवा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना उमेदवारी, दहा टक्के मुस्लिमांना उमेदवारी देण्याचे दिले होते आश्वासन... पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 38 उमेदवारांच्या नावांची केली घोषणा...
मुंबई,दि.23(डि-24 न्यूज)
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी सांगितले होते बारामतीतून लढणार नाही अखेर आज त्यांना तेथूनच उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीत पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान असणार आहे. आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता ते पुन्हा बारामतीतून लढणार हे निश्चित झाले आहे. दहा टक्के मुस्लिमांना तिकीट देणार असे पवारांनी सांगितले होते परंतु आज दोनच मुस्लिम नेत्यांना तिकीट दिले आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ, मुंब्रा कळवा येथून नजीब मुल्ला यांची उमेदवारी आज त्यांनी जाहीर केली.
दिलिप वळसे पाटील आंबेगाव, येवला येथून छगन भुजबळ श्रीवर्धनमधून आदीती तटकरे, मावळ सुनील शेळके, अहिल्यानगर शहर(अहमदनगर) संग्राम जगताप, परळीतून धनंजय मुंडे, दिंडोरी नरहरि झिरवळ, अहेरी धर्मरावबाबा आत्राम, अंमळनेर अनिल पाटील, उदगीर संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, माजलगाव प्रकाश सोळंके, वाई मकरंद पाटील, सिन्नर माणिकराव कोकाटे, खेड आळंदी दिलिप मोहिते, इंदापूर दत्तात्रय भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर बनसोडे, कळवण नितिन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले किरण लहामटे, वसमत चंद्रकांत नवघरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके, जुन्नर अतुल बेनके, मोहोळ यशवंत विठ्ठल माने, हडपसर चेतन तुपे, देवळाली सरोज अहेर, चंदगड राजेश पाटील, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कारेमोरे, पुसद इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुलभा खोडके, नवापूर भरत गावित, पाथरी उत्तमराव विटेकर, मुंब्रा कळवा नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            