निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, पुतळा जाळून गाढवावर लावले पोस्टर...!

 0
निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, पुतळा जाळून गाढवावर लावले पोस्टर...!

SIR प्रक्रियेवर काँग्रेस आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंगांवकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्रामक आंदोलन करत कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा प्रतिकित्मक पुतळा जाळून गाढवावर पोस्टर लावून विरोध प्रदर्शन केले.

काँग्रेसच्या निवेदनानुसार, भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे लोकशाही मूल्यांवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप असून, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनीही त्यांच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच, मागील काही महिन्यांत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादीच्या पुनरावलोकनाचा संदर्भ देत मतदारांच्या नावांबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर किरण पाटील डोंगांवकर, डॉ. कल्याणराव काळे, शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, डॉ. अमोल सवंद, अनिल पटेल, विलास औताडे, प्रकाश मुगदिया, युसूफ शेख, डॉ.सरताज पठाण, संदीप ढाकणे, महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, मोहम्मद जाकेर, आमेर अब्दुल सलीम, कैसर बाबा, विशाल बन्सवाल, डॉ पवन डोंगरे, अतिश पितळे, गणेश जाधव, सुभाष जाधव, आबीद जहागिरदार, शेख रईस, योगेश थोरात, सलीम पटेल, रामभाऊ लोखंडे, दृष्टी वैद्य, अकील पटेल, जावेद पठाण, गणेश गायकवाड, शेखर देशमुख, निमेश पटेल, इक्बाल सिंग गिल, किशोर दसपुते, साहेबराव बनकर, उषाताई खंडाळे, चंद्रप्रभा खंडाळे, अनिस पटेल, दिलीप भोसले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन करण्यात आले.

SIR प्रक्रियेबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow