पंतप्रधान आवास योजना शहरी नवीन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

 0
पंतप्रधान आवास योजना शहरी नवीन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जाची मुदत वाढविण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज )- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांच्यासाठी घरकुल अर्ज भरण्याची मुदत किमान एक महिन्याने वाढविण्याची मागणी काँग्रेस माथाडी कामगार संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सदनिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत 23 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची असली तरी अनेक पात्र नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अर्ज भरता आलेले नाहीत. परिणामी अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हिताचा विचार करून अर्ज भरण्याची मुदत किमान एक महिन्याने वाढवावी, जेणेकरून अधिकाधिक पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी मागणी सय्यद अशफाक अली यांनी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मुदतवाढ जाहीर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow