पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार नोंदणीसाठी आवाहन...

 0
पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार नोंदणीसाठी आवाहन...

पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम-2025 मतदार नोंदणीसाठी आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणे बाबतचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यानुसार पदवीधर संघाच्या यापूर्वीच्या याद्या रद्द झालेल्या असून नव्याने पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्यात येत आहे.

पदवीधर मतदार नोंदणी दिनांक 30/9/2025 ते 6/11/2025 या कालावधीमध्ये विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये येथे फॉर्म उपलब्ध होतील तसेच भरलेले फॉर्म दाखल करता येतील.

आपल्या कार्यालयातील तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, संस्था, बँक, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या पैकी जे पदवीधर मतदार नोंदणीस पात्र असतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना आपले स्तरावरुन मतदार नोंदणीची सूचना अवलोकनास आणून देण्यात यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow